हैदराबाद - हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आला आहे. या आरोपींची नावे मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी होती. या एन्काऊंटरनंतर हैदराबादमध्ये आणि देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. जनतेकडून तेलंगणा सरकार आणि पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
27 नोव्हेंबरला या महिला डॉक्टरची बलात्कारनंतर हत्या करून तिला जाळण्यात आले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी अनेक शहरांमध्ये आंदोलने करण्यात आली.
आज या आरोपींचा घटनास्थळी एन्काऊंटर झाल्यामुळे हैदराबादमध्ये पीडितेच्या शेजाऱ्यांनीही पोलिसांचे राखी बांधून आणि मिठाई भरवून कौतुक केले आहे.