नवी दिल्ली/ गाजियाबाद- गाजियाबाद येथे एक अचंबित करणारी घटना समोर आली आहे. येथील एका सॉफ्टवेयर इंजीनियरने पत्नी विरुद्ध न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. मात्र, या घटस्फोटाचे कारण जरा वेगळेच आहे. पत्नी सतत सोशल मीडियावर व्यस्त राहत असल्याच्या कारणामुळे त्याने तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याचिका करणारा पती हा नोएडा येथील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेयर इंजीनियर या पदावर काम करतो. तो इंदिरापूरम भागातील न्यायखंड कॉलिनीत तो वास्तव्याला आहे. दीड वर्षापूर्वी त्याचे करोल बाग येथील एका युवतीशी लग्न झाले होते. लग्नानंतर संसार सुरळीत चालू होता. त्यानंतर त्याच्या पत्नीने अभिनयाच्या शिकवणीसाठी प्रवेश घेतला. मात्र ती जेव्हा घरी यायची तेव्हा ती टिकटॉकवर व्हिडिओ बनवायची तसेच फेसबूक, व्हॉट्स अॅप यासारख्या सोशल मीडिया साईट्सवर व्यस्त राहायची.