हैदराबाद -तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात रविवारी एका टायरच्या गोदामाला आग लागली. ही घटना वनस्थलीपुरम येथील सुषमा थिएटरजवळ घडली. हे ठिकाण वनस्थलीपुरम पोलीस ठाणे परिसरात आहे.
हैदराबाद : वनस्थलीपुरममधील टायरच्या गोदामाला आग - तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्हा
तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात रविवारी एका टायरच्या गोदामाला आग लागली. सुदैवाने, या आगीत जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.
हैदराबाद : वनस्थलीपुरममधील टायरच्या गोदामाला आग
वनस्थलीपुरम अग्निशमन स्थानकाचे एसएफओ श्रीनिवास यांनी आग लागल्याची सूचना सायंकाळी साडेसहा वाजता मिळाल्याचे सांगितले. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
सुदैवाने, या आगीत जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.