दोरीवर उड्या मारणे हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे. मात्र, व्यायामाचा भाग म्हणून याला नेहमीच कमी लेखले जाते. आमचे तज्ज्ञ जुनैद अख्तर सांगतात, की दोरीवरच्या उड्या मारल्याने तुमच्या शरीरात अनेक बदल होतात. तुम्ही लॉकडाऊनच्या या काळात काही दिवस दोरीवर उड्या मारून शरीराला आकार देऊ शकता.
दोरी ही फार जड नसते तसेच ते खेळण्यासाठी, उड्या मारण्यासाठी खूप मोठी जागा लागत नाही. दिवसात १५-२० मिनिटे दोरी खेळल्याने तुम्ही कॅलरीज बर्न करू शकता. दोरी खेळणे हा एक चांगला व्यायाम आहे. यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. आपल्याला कॅलरी बर्न करण्यासाठी बरेच मैल चालावे लागते, त्यापेक्षा दोरीचा वापर केलेला जास्त फायदेशीर ठरेल. तुम्ही कॅलरी काऊंटरच्या मदतीने तुम्हाला जेवढ्या कॅलरी बर्न करायच्या आहे, तेवढ्या करू शकतो.