महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाक माध्यमाचा नापाक कारनामा; पुलवामातील हल्लेखोरांना संबोधले 'स्वातंत्र्य सैनिक' - pulwama terror attack

पुलवामाच्या हल्ल्यात ४४ भारतीय सैनिकांना ठार केल्याचे पाकिस्तानी मीडियाकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमधील 'द नेशन' या वृत्तपत्राने हल्लेखोरांना स्वातंत्र्य सैनिक (Freedom Fighter) म्हटले आहे.

'द नेशन'

By

Published : Feb 15, 2019, 8:22 PM IST

नवी दिल्ली - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४५ जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानमधील माध्यमाने या हल्लेखोरांना चक्क 'स्वातंत्र्य सैनिक' संबोधले आहे.

पुलवामाच्या हल्ल्यात ४४ भारतीय सैनिकांना ठार केल्याचे पाकिस्तानी मीडियाकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमधील 'द नेशन' या वृत्तपत्राने हल्लेखोरांना स्वातंत्र्य सैनिक (Freedom Fighter) म्हटले आहे. भारताच्या जखमेवर मीठ चोळायचे काम पाकिस्तानच्या माध्यमांकडून करण्यात येत आहे. तसेच या वृत्तपत्राने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद' या संघटनेने हा हल्ला घडवल्याचे वृत्तही संघटनेच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने फेटाळले आहे. तर भारतव्याप्त काश्मीरमधील तरुणाईचे हे कृत्य असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

'द नेशन'

काल (गुरुवारी) पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांचा आकडा ४५ वर पोहोचला आहे. आज (शुक्रवार) आणखी २ जवानांना वीरमरण आले. ३८ जवानांवर काश्मीरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जैशचा दहशतवादी २२ वर्षीय आदिल अहमद दार याने हा आत्मघातकी हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यावर दुःख व्यक्त करताना जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे म्हटले आहे. जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

पुलवामा हल्ल्यावरुन पाकिस्तान दुटप्पी भूमिका घेताना दिसत आहे. एकीकडे पाकिस्तान सरकारकडून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच, पुलवामा हल्ला म्हणजे गंभीर चिंतेचा विषय असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. याशिवाय, जगात कुठेही हिंसा झाली तरी पाकिस्तान त्याचा निषेधच करतो. असेही पाकिस्तानकडून नमूद करण्यात आले आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी माध्यमे पुलवामातील हल्लेखोरांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून संबोधत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details