जयपूर - कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशभरात उपाययोजनया करण्यात येत आहे. शासनासह काही नागरिकही आपापल्या परिने प्रयत्न करताहेत. राजस्थानच्या कोटा येथील केशवपूरा भागातील महिलांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून लॉक डाऊन दरम्यान काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कपड्यांपासून मास्क तयार करून निशुल्क वाटप केले.
एकीकडे कोरोना विषाणूने देशभर थैमान घातले आहे. अशात सामाजिक जबाबदारी म्हणून राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील केशवपुरा भागातील महिलाही पुढे येऊन मदत करताहेत. या महिलांनी एक सहाय्यता समूह तयार केला. त्यानंतर आपापल्या घरातून करून कपडे गोळा करून त्यापासून मास्क तयार केले. तसेच जे पोलीस कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी जे आपला जीव धोक्यात घालून काम करताहेत, त्यांना या मास्कचे वितरण केले. त्या दररोज सरासरी २०० मास्क तयार करतात. आत्तापर्यंत त्यांनी ५ हजार मास्कचे वाटप केले आहे.