महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानातही होळीची धामधूम; हिंदुंसह इतर धर्मिय सहभागी

भारतात मुस्लीम, ख्रिश्चन आणि इतर लोक हिंदूसोबत होळी साजरा करतात. होळी बंधुभाव जपण्याचा आणि परस्परात सौहार्द जपण्याचा सण आहे,अशी लोकांची धारणा आहे.

कराचीत होळी साजरा

By

Published : Mar 21, 2019, 12:41 PM IST

कराची - संपूर्ण भारतात होळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. त्याच बरोबर शेजारी देश पाकिस्तानातही होळी साजरा होत आहे. कराचीतील हिंदू समुदायाने होळी मोठ्या उत्साहात साजरा केली. होळीच्या या उत्सवात कराची विविध रंगांनी रंगून गेली होती.

होळी हा भारतीय समाजातील महत्वाचा उत्सव आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. तसेच, मिठाई वाटून हा सण साजरा करतात. या दिवशी होलिका दहन केले जाते. याला सर्व दुर्गुणांचे दहन म्हणून पाहिले जाते. चांगल्याचा विजय आणि वाईटाचा शेवट याचे प्रतिक म्हणून होलिका दहन केले जाते.

हा सण मुख्यतः हिंदू समुदायाचा असला तरी यात इतर धर्मिय देखील मोठ्या संख्येने सामील होतात. भारतात मुस्लीम, ख्रिश्चन आणि इतर लोक हिंदूसोबत होळी साजरा करतात. होळी बंधुभाव जपण्याचा आणि परस्परात सौहार्द जपण्याचा सण आहे,अशी लोकांची धारणा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details