महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'पहिला दहशतवादी हिंदू' वक्तव्याप्रकरणी कमल हसन यांना अटकपूर्व जामीन

'स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता, त्याचे नाव नथुराम गोडसे,' असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर 'प्रक्षोभक भाषण करुन जनतेमध्ये जातीय सलोखा बिघडवणारे वक्तव्य केल्याचा' गुन्हा दाखल झाला होता.

कमल हसन

By

Published : May 20, 2019, 5:15 PM IST

Updated : May 20, 2019, 5:51 PM IST

चेन्नई - मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष कमल हसन यांना मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 'स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता, त्याचे नाव नथुराम गोडसे,' असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर 'प्रक्षोभक भाषण करुन जनतेमध्ये जातीय सलोखा बिघडवणारे वक्तव्य केल्याचा' गुन्हा दाखल झाला होता.

कमल हसन यांचे संपूर्ण भाषण विचारात घेऊन तसेच ते एका नोंदणीकृत राजकीय पक्षाचे नेते असल्याने न्यायमूर्ती बी. पुगालेंधी यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याचबरोबर पुढील पंधरा दिवसात हसन यांनी करुर येथील कोर्टात हजेरी लावण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. हसन यांच्यावर भादंवि कलम १५३ (ए), २९५ (ए) नुसार प्रक्षोभक भाषण करुन जनतेमध्ये जातीय सलोखा बिघडवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'आपण केवळ गोडसेबाबत हे विधान केले होते. ते सर्व हिंदूसाठी नव्हते,' असे स्पष्टीकरण हसन यांनी कोर्टाला दिले. चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी कमल हासन यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण केले होते. त्या वेळी, ‘स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. त्याचे नाव नथुराम गोडसे,’ असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काहींनी त्यांना पाठिंबा दिला होता, तर काहींनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती.

Last Updated : May 20, 2019, 5:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details