झालावाड़ (राजस्थान) -येथे धर्म जागरण मंचचे जिल्हा संयोजक महिपाल सिंह शक्तावत यांनी स्वत:च्या घरात आज (शनिवारी) सकाळी रिव्हॉल्वरने गोळी मारत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
रुग्णालयातून आज सकाळी माहिती मिळाली की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित धर्म जागरण मंचाचे जिल्हा संयोजक महिपाल सिंह शक्तावत यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे झालावाड कोतवाली ठाण्याचे सीआई बलवीर सिंह यांनी सांगितले. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत एफएसएलची टीमलाही बोलावण्यात आले.