महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेश : चंबा जिल्ह्यात हिमवर्षावामुळे दोन ते तीन इंचाचा बर्फाचा थर - Cold outbreak in tribal areas

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील भरमौर आणि पांगी येथे आदिवासी भागात ताज्या हिमवर्षावामुळे दोन ते तीन इंचाचा बर्फाचा थर तयार झाला आहे. शिवाय, येथे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास अधून-मधून पाऊस पडल्यामुळे येथील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे थंडीचा प्रकोप वाढत आहे.

हिमाचल प्रदेश

By

Published : Nov 24, 2019, 11:31 PM IST

चंबा -हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील भरमौर आणि पांगी येथे आदिवासी भागात ताज्या हिमवर्षावामुळे दोन ते तीन इंचाचा बर्फाची दुलई तयार झाली आहे. शिवाय, येथे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास अधून-मधून पाऊस पडल्यामुळे येथील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे थंडीचा प्रकोप वाढत आहे.

हिमाचल प्रदेश : चंबा जिल्ह्यात हिमवर्षावामुळे दोन ते तीन इंचाचा बर्फाचा थर

शनिवारीही येथील हवामान ढगाळ राहिले. दिवसभर सूर्य ढगांच्या मागे गेल्यामुळे ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. जिल्ह्यातील आदिवासी भागातील सुराल, भटोररियां, कमार-परमार या गावांमध्ये दो से तीन इंच हिमवर्षाव झाला. तर, भरमौरच्या भरमाणी माता मंदिरासह कुगती, क्वारसी, क्यूर गावांमध्येही बर्फवृष्टी झाली आहे.

हवामान विभागाने 23 नोव्हेंबरपर्यंत जोरदार पाऊस आणि हिमवर्षावाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच, जिल्ह्यामध्ये अलर्ट जारी केला आहे. यामुळे लोकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. तसेच, लोक अनेक ठिकाणी शेकोटी पेटवून थंडीपासून संरक्षण करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details