नवी दिल्ली - तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागली २४ तासांत देशात ३ हजार ९०० नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून तब्बल १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.
चिंताजनक...! देशात मागील २४ तासांत ३ हजार ९०० नवे रुग्ण; तर १९५ मृत्यू - कोरोना बातमी
देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४६ हजार ४३३ झाली आहे. यातील ३२ हजार १३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४६ हजार ४३३ झाली आहे. यातील ३२ हजार १३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १२ हजार ७२७ जण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांचा आकडा १ हजार ५६८ झाला आहे. सरकारने लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे. मात्र, त्यामुळे देशातली कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
'जर सोशल डिस्टंसिंग पाळलं गेल नाही, तर कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालायचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिला आहे. आंतरराज्य मालवाहतूक करताना काहीही अडचण येता कामा नये, याची संबधीत राज्याने काळजी घ्यावी. केंद्रीय गृहमंत्रालायच्या १९३० हेल्पलाईनवर किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या १०३३ या मदत क्रमांकावर ट्रकचालक किंवा वाहतूक करणारे तक्रार नोंदवू शकतात, असे केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव पी. श्रीवास्तव यांनी काल(सोमवारी) सांगितले.