मुंबई- कोरोना विषाणूने भारतामध्ये झपाट्याने पाय पसरायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाबत चिंतामुक्त असलेल्या भारतीयांची चिंता आता वाढली आहे. देशभरातील कोरोना बाधितांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 39 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 3 परदेशातील रूग्णांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus : भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, राज्यात 39 जण आढळले - Coronavirus
देशभरातील कोरोना बाधितांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 39 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 3 परदेशातील रुग्णांचा समावेश आहे.
भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात
महाराष्ट्राखालोखाल केरळमध्ये सर्वाधिक 24 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. तर उत्तर प्रदेश 12, कर्नाटक ८, जम्मू आणि काश्मीर 3, दिल्ली 7, आंध्रप्रदेश 1, तेलंगणा 4, हरियाणा 1, ओडिशा 1, पंजाब 1, राजस्थान 2, तामिळनाडू 1, लडाख 4, उत्तराखंड 1 याप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये आतापर्यंत 126 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 22 विदेशातील रूग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत भारतात कोरोना बाधित 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.