महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा; 'ही' ठिकाणे निशाण्यावर - Intelligence buero

बुधवारी गडचिरोलीच्या कुरखेडा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाडीला भूसुरुंग लावून उडवण्यात आले होते. त्यामध्ये १६ जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर आयबीने इशारा दिला आहे.

Naxal Attack

By

Published : May 2, 2019, 5:32 PM IST

लखनौ -गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर विभागाने उत्तर प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. गडचिरोलीच्या पार्श्वभूमिवरच येथील काही भागांमध्ये नक्षलवादी हल्ला होऊ शकतो, असे विभागाचे म्हणणे आहे. आयबीने हा इशारा उत्तर प्रदेश पोलिसांना दिला आहे.


बुधवारी गडचिरोलीच्या कुरखेडा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाडीला भूसुरुंग लावून उडवण्यात आले होते. त्यामध्ये १६ जवानांना वीरमरण आले होते. त्यामध्ये गाडी चालकाचाही समावेश होता. त्यानंतर उत्तर प्रदेशाला अतिदक्षतेचा इशारा दिल्यामुळे खळबळ उडालेली आहे. उत्तर प्रदेशातील चंदौली, मिरझापूर आणि सोनभद्र हे ठिकाण नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे आयबीचे म्हणणे आहे.


यापूर्वी नक्षलवाद्यांनी कुरखेड्याच्याच दादापूर येथे तब्बल २७ वाहने, यंत्रसामग्री आणि कार्यलय पेटवून दिले होते. मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये शांततेत सहभाग नोंदवला होता. लोकांमध्ये मतदान न करण्याचे आवाहन केल्यानंतरही लोक मतदार केंद्रांपर्यंत पोहोचले. याचा राग नक्षलवाद्यांच्या मनात होता. त्यातूनच हा हल्ला घडवला असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकार कठोर पावले उचलेल असेही मुनगंटीवार म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details