'असा' करा 'कोरोना'पासून तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा बचाव - कोरोना विषाणू
कोरोनापासून बचावासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून काही उपाय सुचवले आहेत...
कोरोना
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालली आहे. चीनमध्ये जवळपास १७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भारतासह जगभरातील अनेक देशात या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून खबरदारी घेण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.
अशी घ्या खबरदारी -
- दिवसातून वारंवार हात स्वच्छ धुवावेत. यासाठी साबण किंवा अल्कोल मिश्रित असलेली जंतुनाशकांचा (हॅण्डवॉश) वापर करावा.
- खोकताना आणि शिंकताना टिशू पेपरचा वापर करावा. ज्याद्वारे नाक-तोंड झाकले जाईल. त्यानंतर ते ताबडतोब कचऱ्यात टाकून द्या आणि आपले हात स्वच्छ धुवा.
- ज्याला ताप आणि खोकला आहे, त्याच्याशी जवळचा संपर्क टाळा.
- जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण येत असेल तर तत्काळ वैद्यकीय सेवा घ्याव्यात. आणि तुम्ही कोठून प्रवास केला असेल त्याची माहिती डॉक्टरांना सांगा.
- कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशा ठिकाणच्या भागातील जिवंत प्राणी आणि त्यांनी स्पर्श केलेल्या पृष्ठभागाशी थेट असुरक्षित संपर्क टाळावा.
- कच्चे किंवा न शिजवलेल्या प्राण्यांच्या उत्पादनांचे (मांस) सेवन करू नका. कच्चे मांस, दूध किंवा जनावरांच्या अवयवांना काळजीपूर्वक हाताळा जेणेकरून न शिजवलेल्या पदार्थांचा संसर्ग होऊ नये.