महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत; 250 गावांचा वीज पुरवठा खंडीत

बागेश्वर, गरुड  येथे रात्री उशिरापासून पाऊस पडत आहे. जोरदार हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमानात सतत घसरण होत आहे. थंडी टाळण्यासाठी नाकरिक बोनफायर आणि गरम कपड्यांचा सहारा घेत आहेत.

heavy-snowfall-in-districts-of-uttarakhand
उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत

By

Published : Dec 14, 2019, 11:36 AM IST

उत्तराखंड- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून जोरदार हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे अनेक महामार्ग बंद झाले आहेत. तर 250 गावांमधील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत

हेही वाचा-नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक सर्व राज्यांना लागू करावेच लागणार; 'ही' आहे घटनात्मक तरतूद

तर बागेश्वर, गरुड येथे रात्री उशिरापासून पाऊस पडत आहे. जोरदार हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमानात सतत घसरण होत आहे. थंडी टाळण्यासाठी नाकरिक बोनफायर आणि गरम कपड्यांचा सहारा घेत आहेत. तर काही ठिकाणी उंच भागात हिमवृष्टीमुळे विद्युत यंत्रणा कोलमडली आहे. सुमारे 250 गावांची वीज पुरवठा खंडीत झाला आहे. एनएच 309 ए बागेश्वर-पिथौरागड हा विजयपूरजवळ बर्फवृष्टीमुळे मार्ग बंद झाला आहे. जेसीबीच्या साह्याने येथील बर्फ हटविण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details