महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 : कोलकातामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन.. - कोलकाता आरोग्य कर्मचारी आंदोलन

कोरोनासारखा घातक आजार झालेल्या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक ती सुरक्षेची साधनेच रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्यामुळे, कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.

Health workers stage protest at COVID-19 hospital in Kolkata
COVID-19 : कोलकातामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन..

By

Published : Apr 4, 2020, 11:07 AM IST

कोलकाता - कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना पुरेशी संरक्षक साधने उपलब्ध नसल्यामुळे, पश्चिम बंगालच्या एका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दक्षिण कोलकातामधील एका सरकारी रुग्णालयात हा प्रकार समोर आला.

दक्षिण कोलकातामधील राज्य सरकारमार्फत चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आंदोलन करत, वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षाला घेराव घातला. कोरोनासारखा घातक आजार झालेल्या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक ती सुरक्षेची साधनेच रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्यामुळे, कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.

यासोबतच, रुग्णालयामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी वैयक्तिक सुरक्षा साधनेही (पीपीई) उपलब्ध नसल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. तसेच, विलगीकरण कक्षामध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांचा दुसऱ्या कक्षातील रुग्णांशीही संपर्क होत असल्यामुळे, त्या रुग्णांनाही कोरोना होण्याची शक्यता असल्याचे परिचारिकांचे म्हणणे आहे.

काही काळ निदर्शने केल्यानंतर कर्मचारी आणि परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा :जागतिक आरोग्य संस्थेच्या 'एकता चाचणी'मध्ये देशही होणार सहभागी..

ABOUT THE AUTHOR

...view details