बंगळुरू- शहरातील सादिक नगर परिसरातील एका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर टवाळखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णाची सुश्रुषा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एका समुहावर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
जवळपास ४० ते ५० लोकांचा समूह माझ्याजवळ आला आणि त्यांनी मला घेरत माझ्या कामावर आक्षेप नोंदवला. मेडिकल रेकॉर्डची नोंद असलेली वही ते घेऊन गेले आणि त्यांनी इतर रहिवाशांना बजावले, की कुठलीही माहिती यांना देऊ नका, अशी आपबीती एकाने सांगितली.