नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपूर्ण भारत अभियानासाठी २० लाख कोटी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. 'आपल्या भाषणातून देशातील माध्यमांना वृत छापण्यासाठी हेडलाईन दिली. मात्र, प्रवासी कामगारांसाठी कोणतीही हेल्पलाईन दिली नाही. तुमची राष्ट्र निर्मात्या कामगारांप्रती असलेली असंवेदनशीलता पाहून निराश आहोत, असे रणदीप सुरजेवाला यांनी टि्वट केले आहे.
आज आपल्या भाषणातून तुम्ही देशातील माध्यमांना हेडलाईन दिली. मात्र, देश हा मदतीच्या हेल्पलाईनची वाट पाहत आहे. तुम्ही जाहीर केलेलं हे पॅकेज आश्वासनापासून वास्तविकतेपर्यंतचा प्रवास पूर्ण करून सत्यात उतरेल, याची वाट पाहात आहोत, असे सुरजेवाला यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.