महाराष्ट्र

maharashtra

जेडीएस नेते देवे गौडा यांची नातवाला लोकसभा उमेदवारी देण्याची घोषणा

By

Published : Mar 14, 2019, 4:08 PM IST

'मी सर्वांनाच प्राधान्य दिले आहे. आम्ही साकलेशपूर येथे लिंगायत नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी दिली. मात्र, माझ्यावर स्वत-्च्या मुलाला आणि नातवाला उमेदवारी देत असल्याचे आरोप होत आहेत. माझ्यात ताकद असेपर्यंत मी काम करत राहीन,' असे देवे गौडा म्हणाले.

देवे गौडा

बंगळुरु - माजी पंतप्रधान आणि जेडीएस अध्यक्ष एच डी देवे गौडा यांनी गुरुवारी त्यांचे नातू प्रज्वल रेवाण्णा यांना लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी देण्याची घोषणा केली. प्रज्वल हसन मतदार संघातून निवडणूक लढवतील.

'चन्नाकेशव देवाच्या आशीर्वादाने मी माझा नातू प्रज्वल रेवाण्णा याला हसन मतदार संगातील उमेदवारी दिली आहे,' अशी माहिती देवे गौडा यांनी मुदालाहिप्पे गावात पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेत दिली. होलेनारशीपूर तालुक्यात हे गाव आहे. नातवाच्या उमेदवारीची घोषणा करताना देवे गौडा भावूक झाले होते. सध्या त्यांच्यावर स्वतःच्या कुटुंबीयांनाच उमेदवारी देत असल्याचा आरोप होत आहे. मा६, त्यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे.

'मी सर्वांनाच प्राधान्य दिले आहे. आम्ही साकलेशपूर येथे लिंगायत नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी दिली. मात्र, माझ्यावर स्वत-्च्या मुलाला आणि नातवाला उमेदवारी देत असल्याचे आरोप होत आहेत. माझ्यात ताकद असेपर्यंत मी काम करत राहीन,' असे देवे गौडा म्हणाले.

प्रज्वल रेवाण्णा हे राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री एच. डी. रेवाण्णा यांचे पुत्र आहेत. त्यांनी अनेकदा उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले आहेत. गौडा यांनी अनेकदा त्यांच्या नातवाला उमेदवारी देण्याचा प्रयत्न याआदी केला आहे. मात्र, प्रथमच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागांसाठी २ टप्प्यांमध्ये मतयुद्ध रंगणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्येकी १४ जागांसाठी अनुक्रमे १८ एप्रिल आणि २३ एप्रिलला निवडणूक होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details