महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हाथरस प्रकरण : पीडितेचं कुटुंब गाव सोडण्याच्या विचारात - हाथरस बलात्कार प्रकरण अपडेट

हाथरस बलात्कार प्रकरणी सीबीआयने चारही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयकडून आरोपपत्र दाखल करण्याच्या दोन दिवसानंतर पीडित कटुंबाने गाव सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही भीतीत जगतोय. आम्हाला पुढे आमचं मरण दिसत आहे. त्यामुळे आम्ही गाव सोडण्याच्या विचारता आहोत, असे पीडितेच्या कुटुंबाने म्हटलं आहे.

हाथरस प्रकरण
हाथरस प्रकरण

By

Published : Dec 20, 2020, 1:06 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरस बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने चारही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयकडून आरोपपत्र दाखल करण्याच्या दोन दिवसानंतर पीडित कटुंबाने गाव सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सीबीआयने हाथरस बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयकडून आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. चारही आरोपी गावातील उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. गावातील इतर कुटुंब आमची मदत करण्यास तयार नाहीत. गावात सर्वांत जास्त त्यांचीच घरे आहेत. ते आमच्याशी बोलतही नाहीत. शुक्रवारी चार्जशिट दाखल केल्यानंतर परिस्थिती आणखी प्रतिकूल झाली आहे, असे पीडितेच्या भावाने सांगितले.

आम्हाला पुढे आमचं मरण दिसतय -

आरोपींच्या कुटुंबीयांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे त्यांना गावात सीआरपीएफ सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, नेहमीच सुरक्षारक्षक राहणार नाहीत. आम्ही भीतीत जगतोय. आम्हाला पुढे आमचं मरण दिसत आहे. त्यामुळे आम्ही गाव सोडण्याच्या विचारता आहोत, असे पीडितेच्या कुटुंबाने म्हटलं आहे.

हाथरस प्रकरण -

हाथरस जिल्ह्यात 14 सप्टेंबरला ही हृद्यद्रावक घटना घडली होती. पीडिता शेतात गेली असता गावातील चार सवर्ण तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. यावेळी पीडितेला मारहाण करत गंभीर जखमी केले होते. पीडितेच्या मानेला आणि मणक्याला गंभीर इजा झाली होती. दिल्लीत उपचार सुरू असताना 15 दिवसांनंतर पीडितेचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर पोलिसांनी पीडित तरुणीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. या घटनेविरोधात देशभरातून निषेध नोंदवण्यात आला होता.

हेही वाचा - क्राइम डॉसिअर : फक्त एक बटण दूर!

ABOUT THE AUTHOR

...view details