नवी दिल्ली -हरयाणवी लोकगायिका आणि डान्सर सपना चौधरीने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीतील जवाहर लाल नेहरू स्टेडियममध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान, भाजपचे महासचिव रामलाल आणि मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश केला.
काही महिन्यांपूर्वीही सपना चौधरी भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा होती. मात्र, स्वतः सपना चौधरीने राजकारणात येण्याचा विचार नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला होता. परंतु आज रविवारी सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश करत राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे सांगितले आहे.