महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'जात' नाही ती 'जात' घालवणार जिंदमधील खेरा खाप पंचायत! - खेरा खाप पंचायत

खेरा खाप पंचायतीचे प्रवक्ता उदयवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाप पंचायतीच्या सदस्यांनी २४ गावांना भेट दिल्यानंतर सर्वांना एकत्र आणण्याचे ठरवले. त्यानंतर झालेल्या सर्वजातीय संमेलनानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

'जात' नाही ती 'जात' घालवणार जिंदमधील खेरा खाप पंचायत!

By

Published : Jul 22, 2019, 3:31 PM IST

हरियाणा - गेल्या कित्येक दशकांपासून सुरु असलेला जातीपातीमधून होणारा भेदभाव संपवण्यासाठी हरियाणामधल्या जिंद जिल्ह्यातील खेरा खाप पंचायतीने नामी शक्कल लढवली आहे. या पंचायतीने आपल्या नवीन फतव्यात लोकांना आपले आडनाव सोडून त्याजागी आपल्या गावाचे नाव वापरण्याचे आवाहन केले आहे.


भोंसला गावात या पंचायतीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला २४ गावांमधील खाप प्रमुख उपस्थित होते. सतबीर पहलवान हे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. जातीपातीमधून होणाऱ्या भेदभावाचे मूळ कारण हे 'गोत्र' असल्याचा मुद्दा सतबीर यांनी या बैठकीत मांडला.


खेरा खाप पंचायतीचे प्रवक्ता उदयवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाप पंचायतीच्या सदस्यांनी २४ गावांना भेट दिल्यानंतर सर्वांना एकत्र आणण्याचे ठरवले. त्यानंतर झालेल्या सर्वजातीय संमेलनानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला.


आपले गोत्र हे आडनाव म्हणून न वापरता त्याऐवजी आडनाव म्हणून आपापल्या गावाचे नावच वापरण्याचे आवाहन आम्ही लोकांना केले आहे. त्यासोबतच पंचायतीने घरांवर वा गाड्यांवर आपले गोत्र किंवा जात लिहिण्यास बंदी केली आहे. या उपायांनी नक्कीच जातीवरून होणारा भेदभाव कमी होऊन समाजातील सर्व लोक एकत्र येतील असा विश्वास आहे, असेही उदयवीर यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details