नवी दिल्ली - महाराष्ट्र सरकारने किल्ल्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावरुन गुजरातमधील काँग्रसेचे नेते हार्दिक पटेल यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. गडकिल्ले भाड्याने द्यायला ते काय तुमच्या बापाची जहागिरी नाही. एवढीच भीक लागली असेल तर मंत्र्यांचे बंगले, मंत्रालय, राजभवन भाड्याने द्या असे मराठीतून ट्वीट करत पटेल यांनी सरकारवर टीका केली.
खबरदार..! गडकिल्ले काय तुमच्या बापाची जहागिरी नाही - हार्दिक पटेल - गुजरातमधील काँग्रसेचे नेते हार्दिक पटेल
महाराष्ट्र सरकारने किल्ल्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावरुन गुजरातमधील काँग्रसेचे नेते हार्दिक पटेल यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
हार्दिक पटेल
हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील काही गडकिल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंबंधीचे वृत्त एका वृत्तपत्रानं दिलं होतं. या वृत्तानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. किल्ले जर भाड्याने द्याल तर खबरदार महाराष्ट्र भाजप सरकार असेही पटेल यांनी म्हटले आहे