नवी दिल्ली - काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी गृहमंत्री अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, शुभेच्छा देताना मला काही भाजप कार्यकर्त्यांच्या "अब तेरा क्या होगा हार्दिक" अशा धमक्या देत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
"अब तेरा क्या होगा हार्दिक..?" अमित शाह गृहमंत्री झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या धमक्या - bjp
हार्दिक पटेल गुजरामध्ये पाटीदार आंदोलनामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी पाटीदार समुदायाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या आंदोलनादरम्यान अमित शाहांच्या इशाऱ्यावरूनच आंदोलकांवर कारवाई सुरू असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला होता.
हार्दिक पटेल यांनी ट्विट करत अमित शहांना गृहमंत्रीपदी निवड झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. "अमित शाह गृहमंत्री बनले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. मात्र, मला काही भक्तांचे मेसेज येत आहेत. त्यात ते विचारत आहेत, की अब तेरा क्या होगा हार्दिक. याचा अर्थ अमित शाह गृहमंत्री बनल्यामुळे भक्त खूप खूश दिसत आहेत. भाजपविरूद्ध लढणाऱ्या आमच्यासारख्या युवकांना मारून टाकले जाईल का? चला... जशी देवाची कृपा...!" अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
हार्दिक पटेल गुजरामध्ये पाटीदार आंदोलनामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी पाटीदार समुदायाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या आंदोलनादरम्यान अमित शाहांच्या इशाऱ्यावरूनच आंदोलकांवर कारवाई सुरू असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला होता. लोकसभा निवडणुकीपुर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी निवडणूकही लढवण्याचाही मास व्यक्त केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना मज्जाव केला होता.