कोटा (राजस्थान) - गुर्जर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. यासोबतच कोटा रेल्वे मंडळातून जाणाऱ्या 12 हून अधिक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, अशी माहिती कोटा मंडळाचे वरिष्ठ डीसीएम अजय पाल यांनी सांगितले. यात अनेक रेल्वे गाड्यांना कोट्याला आणले जाणार नाही. त्यांना इतर मार्गाने वळविण्यात येणार आहे. गुर्जर आरक्षणाच्या समस्येवर तोडगा काढावा तसेच विविध मागण्यांसाठी गुर्जर समाजाच्यावतीने आज राजस्थानमध्ये आंदोलन सूरू आहे. आरक्षणासाठी रुळावर उतरलेला गुर्जर समाज आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या मार्गावर आहे. गुर्जर नेते कर्नल किरोरी बैंसला यांचा मुलगा विजय बैंसला यांनी आजपासून चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.
अजय पाल म्हणाले की, काही आणखी रेल्वे आहेत, ज्यांना मार्ग बदलवत त्यांना कोटा येथून संचालित केले जाईल. याप्रकारामुळे अधिक वेळ जाणार आहे. तसेच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. सोबतच कोटा रेल्वे मंडळ जेथून 20 प्रवासी रेल्वे गाड्या एका दिवसातून चालविल्या जात आहेत. यासोबतच 20हून अधिक फ्रेट रेल्वेही येथून जातात. या सर्वांना वळविण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात येणाऱ्या 'या' रेल्वेचे बदलण्यात आले मार्ग -
- 02952 दिल्ली-मुंबई दरम्यान चालणारी राजधानी एक्सप्रेसला मथुरा, आगरा, झांसी, बीना आणि नागदामार्गे जाणार.
- दिल्ली-मुंबईदरम्यान धावणारी अगस्त क्रांति 0954 एक्सप्रेसला मथुरा, आगरा, झांसी, बीना आणि नागदामार्गे जाणार.
- 02493 पुणे निजामुद्दीन एक्सप्रेसला नागदा, बीना, आगरा कैंट, मथुरामार्गे वळविण्यात आले आहे.
- दिल्ली-मुंबई दरम्यान धावणारी 02926 पश्चिम एक्सप्रेसला मथुरा, आगरा, झांसी, बीना व नागदामार्गे जाणार.
महाराष्ट्राबाहेरील 'या' रेल्वेंचे वळविण्यात आले मार्ग -
- ट्रेन नंबर 09039 अवध एक्सप्रेसला सवाई माधोपुरमध्ये थांबवण्यात आले. तिला जयपुर बांदीकुई मार्गे मथुराच्या मार्गे वळविण्यात आले.
- ट्रेन नंबर 02060 निजामुद्दीनहून कोटा दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेसला भरतपुरहून वळवत बांदीकुई जयपुर सवाई माधोपुरच्या मार्गाने कोटा येथे येत आहे.
- 02401 व 02402 नंदा देवी एक्सप्रेसला कोटा सवाई माधोपुर जयपुर नई दिल्ली मार्गाने वळविले जाईल.
- 02415 व 02416 इंटरसिटी एक्सप्रेसला दिल्ली-जयपुर-सवाई माधोपुर-कोटा मार्गाने वळविले.
- 02963 व 02964 मेवाड़ एक्सप्रेसला उदयपुर, चित्तौड़गढ़, चंदेरिया, भीलवाड़ा, अजमेर, जयपुर, दिल्लीच्या मार्गाने वळविले जाईल.
गुर्जर आरक्षण आंदोलन - जयपूरमध्ये इंटरनेट सेवेवर आणखी २४ तासांनी वाढवले निर्बंध