महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहार निवडणूक : पांडेजींचा पत्ता कट; बक्सर आणि वाल्मिकीनगरमधून निवडणूक लढण्याचे स्वप्न भंगले

गुप्तेश्वर पांडे यांना वाल्मिकीनगरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. वाल्मिकीनगरचे खासदार वैद्यनाथ प्रसाद महतो यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे जदयूकडून याठिकाणी गुप्तेश्वर यांना तिकीट मिळण्याची आशा होती. मात्र, जदयूने वैद्यनाथ महतो यांचे पुत्र सुनील कुमार यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे गुप्तेश्वर यांना तिकीट मिळण्याची दुसरी शक्यताही लोप पावली.

Gupteshwar Pandey did not get ticket from Buxar and Valmikinagar
बिहार विधानसभा निवडणूक : गुप्तेश्वर पांडेंचा पत्ता कट; बक्सर आणि वाल्मिकीनगरमधूनही तिकीट नाही

By

Published : Oct 8, 2020, 7:38 AM IST

पाटणा :बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे बिहार विधानसभा निवडणूक लढवतील याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. त्यांनी जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षात प्रवेशही केला होता. मात्र, त्यांना अपेक्षित असलेल्या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही.

बक्सर हा भाजपचा गड मानला जातो. गुप्तेश्वर पांडे जेडीयूमध्ये गेल्यानंतर, त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येईल अशा शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या. मात्र, एनडीएमध्ये झालेल्या जागावाटपानंतर बक्सरचा मतदारसंघ भाजपला मिळाला. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये बक्सरच्या उमेदवाराची घोषणा न करण्यात आल्यामुळे लोकांची उत्सुकता आणखी ताणली गेली होती. मात्र, बुधवारी संध्याकाळी भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये बक्समधून परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी दिल्याचे समोर आले.

यानंतर गुप्तेश्वर पांडे यांना वाल्मिकीनगरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. वाल्मिकीनगरचे खासदार वैद्यनाथ प्रसाद महतो यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे जदयूकडून याठिकाणी गुप्तेश्वर यांना तिकीट मिळण्याची आशा होती. मात्र, जदयूने वैद्यनाथ महतो यांचे पुत्र सुनील कुमार यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे गुप्तेश्वर यांना तिकीट मिळण्याची दुसरी शक्यताही लोप पावली.

यानंतर गुप्तेश्वर यांनी आपण यामुळे आजिबात व्यथित झालो नसल्याचे म्हटले आहे. माझ्या अनेक हितचिंतकांना अपेक्षा होती की मी यावर्षी निवडणुकीत उभा असेल. मात्र, यावर्षी तरी ते शक्य नाही असे दिसते. हरकत नाही, मी माझ्या आयुष्यात बराच संघर्ष केला आहे. मी कायम माझ्या लोकांची, बक्सरची, बिहारची सेवा करत आलो आहे आणि मी इथून पुढेही ती करत राहील असे मत त्यांनी यानंतर बोलताना व्यक्त केले.

हेही वाचा :नागालँडचे माजी राज्यपाल अश्वनी कुमार यांची गळफास घेऊन आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details