गुमला - कामडारा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आमटोली जंगल भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत २ माओवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या भागात अद्याप माओवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
झारखंडमध्ये पोलीस चकमकीत दोन माओवादी ठार - गुमला
कामडारा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आमटोली जंगल भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत २ माओवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
माओ1
कामडारा पोलीस आणि कोबरा बटालियनद्वारे संयुक्त कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षकांनी दोन माओवाद्यांना ठार केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन माओवाद्यांना ठार केल्यानंतर संपूर्ण परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. ठार झालेले माओवादी या परिसरात कुप्रसिद्ध होते.