गांधीगनर - गुजरात उच्च न्यायालयाने सुरतमधील तीन वर्षीय मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. २०१८ साली अनिल यादव नावाच्या व्यक्तीने सुरतमध्ये ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. पीडित कुटुंबीय महाराष्ट्रातील असून गुजरातमध्ये वास्तव्यास होते.
सुरत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा - सुरत बलात्कार आणि हत्या
गुजरात उच्च न्यायालयाने सुरतमधील तीन वर्षीय मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषीला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बिहार राज्यातील बक्सार जिल्ह्यातून अटक केली होती. शहरातील गोदादरा भागातून एक तीन वर्षांची मुलगी १६ ऑक्टोबर २०१८ बेपत्ता झाली होती. या मुलीचा घराजवळील एका बंद इमारतीमध्ये आढळून आला होता. आरोपीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला होता. तसेच घटनेच्या दिवशी मद्यप्राशन केल्याचेही सांगितले.
आरोपी आणि मुलीचे कुटुंबीय एकाच इमारतीमध्ये राहत होते. पीडित कुटुंबीय महाराष्ट्रातील असून गुजरातमध्ये वास्तव्यास होते.
Last Updated : Dec 27, 2019, 2:46 PM IST