गांधीनगर -कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने आपले जीवन संपविले आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी व्यापाऱ्याने धावत्या रेल्वेपुढे उडी मारून आत्महत्या केली. कोरोना संकटामुळे जगभरातली अनेकजण मानसिक तणावाखाली गेले आहेत. यातून रुग्णांकडून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जात आहे. देशातील इतर शहरांमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
कुमारपाल शहा(63) असे आत्महत्या केलेल्या हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. सुरतमधील नानपुरा येथील ते रहिवासी होते. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर शहा तणावाखाली होते. गुरुवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी सकाळी शहा घरातून स्कूटर घेवून उधाना रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली.