अहमदाबाद - गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी 2006 अहमदाबाद कालुपूर रेल्वे स्थानक बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. संबधित आरोपीला गुजरात एटीएसने पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.
2006 अहमदाबाद ब्लास्ट प्रकरणातील एका आरोपीला अटक - gujarat ats
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी 2006 अहमदाबाद कालुपूर रेल्वे स्थानक बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. अब्दुल रजाक गाझी, असे आरोपीचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा सदस्य आहे.
अब्दुल रजाक गाझी, असे आरोपीचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा सदस्य आहे. गेल्या 14 वर्षांपासून त्याचा शोध घेण्यात येत होता. अखेर गुजरात एटीएसने त्याला पश्चिम बंगाल राज्यातील बांगलादेश सिमेजवळील एका गावातून अटक केली आहे. ही माहिती गुजरात एटीएसचे अधिकारी इम्तियाज शेख यांनी दिली.
अब्दुल रजाक गाजीने लष्कर-ए-तोयबाच्या अनेक सदस्यांना सिमा पार करून दिली होती. 26/11 हल्ल्यांचा आरोपी अबु जुंदाल यासही अब्दुलने सिमा पार करून दिली होती. गुजरात 2002 दंगलीचा बदला म्हणून कालुपूर रेल्वे स्थानकावर ब्लास्ट करण्यात आला होता, असे एटीएसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.