महाराष्ट्र

maharashtra

अहमदाबादमधील भगवान जगन्नाथांची रथयात्रा निघणार अत्यंत साध्या पद्धतीने

By

Published : Jun 1, 2020, 5:46 PM IST

यावर्षी भगवान जगन्नाथ रथयात्रेत फक्त तीन रथ सहभागी होतील. प्रत्येक रथासोबत ३० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. मंदिरातील विश्वस्त आणि पुजारी यांच्या उपस्थितीत 23 जून रोजी आषाढी बीजच्या दिवशी यात्रा काढली जाईल

jagnnath yatra
अहमदाबादमधील भगवान जगन्नाथांची रथयात्रा निघणार अत्यंत साध्या पद्धतीने

अहमदाबाद- गुजरातच्या अहमदाबादमध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथ यात्रा आयोजित केली जाणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या १४३ वर्षात प्रथमच कलाकार, भगवान जगन्नाथाचा झोका आणि भक्तांशिवाय ही यात्रा आयोजित केली जाणार आहे.

यावर्षी फक्त तीन रथ या यात्रेत सहभागी होतील. प्रत्येक रथासोबत ३० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. मंदिरातील विश्वस्त आणि पुजारी यांच्या उपस्थितीत 23 जून रोजी आषाढी बीजच्या दिवशी यात्रा काढली जाईल, असे मंदिराचे विश्वस्त महेंद्र झा यांनी सांगितले.

गेल्या १४३ वर्षात प्रथमच फक्त तीनच रथ या यात्रेत सहभागी होतील. कोरोनामुळे या यात्रेत भक्त, आखाड, गायन करणारे कलाकार, मेजवानी करणारे लोक आणि कोणतेही ट्रक येणार नाहीत. यावर्षी पूजा अत्यंत साध्या पद्धतीने केली जाईल. लोकांनी ही पूजा घरी टीव्हीवर लाईव्ह बघावी, असेही झा यांनी सांगितले.

पारंपारिक पद्धतीनुसार भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र, बहीण सुभद्रा यांच्या रथांची मिरवणूक पहाटे सुरू होते आणि सायंकाळी उशिरा या ४०० वर्ष जुन्या मंदिरापर्यंत पोहोचते. १२ तासांत १८ किलोमीटरची मिरवणूक काढून ही यात्रा मुख्य मंदिरात पोहोचते. सोशल डिस्टंसचे पालन करत आम्ही लवकरात लवकर ही मिरवणूक मंदिरात पोहचवण्याचा प्रयत्न करू, असेदेखील झा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details