महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, ५ जखमी - दहशतवादी हल्ला काश्मीर बातमी

जम्मू काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ल्यामध्ये ५ नागरिक जखमी झाले आहेत. श्रीनगरमधील 'हरीसिंग हाय स्ट्रीट' परिसरामध्ये हा हल्ला झाला.

ग्रेनेड हल्ला

By

Published : Oct 12, 2019, 5:28 PM IST

श्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ल्यामध्ये पाच नागरिक जखमी झाले आहेत. श्रीनगरमधील 'हरीसिंग हाय स्ट्रीट' परिसरामध्ये हा हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला

हेही वाचा - काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयावर ग्रेनेड हल्ला, १० जखमी

दहशतवादी हल्ल्यानंतर 'हरीसिंग हाय स्ट्रीट' परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांबरोबर लष्करी दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. मात्र, याबाबत सविस्तर माहिती हाती आली नाही. राज्यातील परिस्थिती सामान्य झाल्याचा काश्मीर सरकार दावा करत असली तरी गोळीबाराच्या आणि ग्रेनेड हल्ल्याच्या घटना मागील काही दिसांपासून समोर आल्या आहेत.

हेही वाचा - पुलवामा पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला, ३ नागरिक गंभीर जखमी

याच महिन्यात ५ ऑक्टोबरला अनंतनाग जिल्ह्यात पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यात १० जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एक वाहतूक पोलीस आणि एका पत्रकाराचा समावेश होता. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही राज्यामध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details