श्रीनगर - काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. श्रीनगरमधील मौलाना आझादनगर येथे भर दुपारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील एकाची स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; एकाचा मृत्यू, १५ जखमी - दहशतवादी हल्ला काश्मीर
घटनेनंतर परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. बाजारामध्ये गर्दी असताना अचानक स्फोट झाल्याचे स्थानिक रहिवासी शेख जबैर यांनी सांगितले.
Grenade attack in J&K
सीसीटीव्हीमध्ये कैद झाली हल्ल्याची दृष्ये-
हेही वाचा : काश्मीर प्रश्न यशस्वीरित्या हाताळून मार्गी लावला, आता चांगल्या ठिकाणी पोहोचलो - सत्यपाल मलिक
Last Updated : Nov 4, 2019, 5:48 PM IST