ग्रेटर नोएडा - यमुना एक्सप्रेसवेवर आज सकाळी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यात ८ लोकांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत.
ग्रेटर नोएडातील यमुना एक्सप्रेसवेवर अपघात; ८ जणांचा मृत्यू, ३० जखमी - road accident
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
बस आणि ट्रकचा भीषण अपघात
यमुना एक्सप्रेसवेवर डबल डेकर बस आणि ट्रकची धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की, बसचे पत्रे उडून गेले. एका खासगी बसने ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही बस औरैया येथून येत होती, असे सांगितले जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Last Updated : Mar 29, 2019, 9:34 AM IST