पाटणा- विलायती चिंच तोडण्याच्या कारणावरून एका मुलाने स्वतःच्याच आजी आणि आत्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना बिहारच्या खरहट (ता. रानीगंज, जि. अररिया) गावात घडली. यानंतर गावकऱ्यांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
विलायती चिंच तोडण्याच्या कारणावरून संबंधितांत वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. पहिल्या गटातील अमली देवी ही महिला आणि तिची मुलगी सोसो देवी या दोघींनीही या वादात उडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गाटातील लोकांनी त्या दोघींना अंगावर पेट्रोल टाकून पेटवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक धूरत शायली सांवलाराम यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपींना तत्काळ ताब्यात घेऊन कारवाई करू, असे आश्वासन दिले.