हैदराबाद - गौतम कुमार यांनी एका दिवसात १ हजारपेक्षा अधिक लोकांना हैदराबादमध्ये अन्नदान करण्याचे विक्रम केला आहे. त्यांच्या या कार्याची नोंद 'युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये करण्यात आले आहे.
एका दिवसात १ हजार लोकांना अन्नदान करत नोंदविले जागतिक विक्रम युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडियाचे प्रतिनिधी के व्ही. रामणा राव आणि तेलंगणा प्रतिनिधी टी. एम. श्रीलता यांनी कुमार यांना हा पुरस्कार प्रदान केला.
कुमार यांनी ३ वेगवेगळ्या ठिकाणी हे अन्नदान केले आहे. त्यात प्रथम गांधी रूग्णालयात त्यानंतर राजेंद्र नगर येथे आणि शेवटी चौथुपपाल येथील अम्मा-नाना अनाथाश्रमातील लोकांना त्यांनी भोजन दिले.
यावेळी बोलताना कुमार म्हणाले, की २०१४ साली मी 'सर्व्ह नीडी' या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून आम्ही अशाप्रकारचे सामाजिक कार्य करत आहोत. परंतु, आज मी एकट्याने १ हजारपेक्षा अधिक लोकांना अन्नदान केले आहे. त्याची आज जागतिक स्तरावर नोंद झाली.
युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड्सने मला त्यांचे प्रमाणपत्र दिले आहे. आमच्यासारखी संस्था येथे अस्तित्वात असताना कोणताही व्यक्ती भुकेने मरणार नाही, हे आमच्या संस्थेचे उद्धिष्ट आहे. आम्ही आमच्या संस्थेचे विस्तार करत आहोत जेणेकरून कोणीही उपासमारीने मरणार नाही. यापुढे अधिकाधिक लोकांची मदत करण्यासाठी आम्हांला दानशूर व्यक्ती आणि सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे, असेही कुमार यावेळी म्हणाले.