नवी दिल्ली - केंद्र सरकार लघु, मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी लवकरच मदतनिधी जाहीर करणार आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे लघु आणि मध्यम उद्योगांचे नुकसान झाले आहे. उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडालया लागली आहे. 'अशा कठीण काळात निर्माण झालेली परिस्थती हाताळण्यासाठी सरकार उद्योगांना मदत करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे'.
'लघु आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांसाठी सरकारचं 'रिलिफ पॅकेज' - भारत अर्थव्यवस्था
केंद्रीय अर्थखाते आणि पंतप्रधान कार्यालयाला आम्ही आमच्या शिफारसी पाठविल्या आहेत. लवकरच मदत निधीची घोषणा होण्याची आशा आहे. शक्य तेवढी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय अर्थखाते आणि पंतप्रधान कार्यालयाला आम्ही आमच्या शिफारशी पाठविल्या आहेत. लवकरच मदत निधीची घोषणा होण्याची आशा आहे. शक्य तेवढी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. गुणवत्तेशी तडजोड न करता उद्योगांनी खर्च कपात करायला हवी. त्यामुळे आंतराराष्ट्रीय बाजारातही स्पर्धा करता येईल. नवनिर्मितीसाठी उद्योगांनी प्रयत्न केले पाहिजे. तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन आणि कौशल्याचा उपयोग करत उद्योगांनी संपत्ती कमवायला पाहिजे. आर्थिक मंदीतही नव्या कल्पना शोधून व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न उद्योगांनी केला पाहिजे, असे गडकरी म्हणाले.