महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

यासिन मलिकच्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटवर बंदी; केंद्राचा निर्णय - यासिन मलीक

यासिन मलिकच्या जेकेएलएफ संघटनेवर बंदी घालण्यावरुन मेहबुबा मुफ्ती यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यासिन मलिक

By

Published : Mar 22, 2019, 11:43 PM IST

नवी दिल्ली - फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटवर (जेकेएलएफ) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. दहशतवादविरोधी कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीरात जेकेएलएफ दहशतवाद पसरवत आहे, असा आरोप केंद्राने केला आहे.

फुटीरतावादी विचारांना प्रोत्साहन देऊन त्या विचारांचा प्रसार जम्मू-काश्मीरमध्ये केला जात असल्याचा ठपकाही जेकेएलएफवर ठेवण्यात आला आहे. बेकायदा कृत्यांवर बंदी घालण्यासाठी पाऊल उचलण्यात आले असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

यासिन मलिकच्या जेकेएलएफ संघटनेवर बंदी घालण्यावरुन मेहबुबा मुफ्ती यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संघटनेवर बंदी घालून सरकारने काय मिळवले असा सवाल मेहबुबा यांनी उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details