सॅनफ्रान्सिस्को -गुगलने स्टैनफोर्ड विद्यापीठासह मिळून वैश्विक कोविड-19 मॅप लॉन्च केले आहे. ज्यामुळे पत्रकारांना वाचकांसाठी आपल्या साइटवर कोरोना संबंधित ताजी माहिती देता येईल. या कोविड-19 ग्लोबल केस मॅपरमधून पत्रकारांना आपल्या क्षेत्रातील किंवा राष्ट्रीय आकडेवारी समजेल.
लोकसंख्येनुसार कोरोनाबाबत माहिती दर्शविण्यात येईल
गुगल न्यूज लॅबचे डेटा एडिटर सिमोन रोजर्स म्हणाले, "यात मागील 14 दिवसांतील लोकसंख्या व कोरोनाची आकडेवारी आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील लोकसंख्या व कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या यात दर्शविण्यात येईल. ज्यामुळे आपण जगातील कोणत्याही शहराशी आपल्या शहराची तुलना करता येईल.