महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चेन्नईमध्ये २९ लाखांचे सोने, सिगारेट अन् लॅपटॉप जप्त - चेन्नई सिगारेट तस्करी

दुबईवरून आलेल्या दोन प्रवाशांनी आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये लपवलेले सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले. तसेच, त्यांच्या सामानातून ५,७६० सिगारेट्स आणि १० लॅपटॉपही मिळाले. दुसऱ्या एका घटनेमध्ये, कोलंबोवरून आलेल्या एका प्रवाशाकडूनही सोने जप्त करण्यात आले. त्याने, आपल्या गुदाशयात हे सोने लपवले होते.

चेन्नईमध्ये २९ लाखांचे सोने, सिगारेट अन् लॅपटॉप जप्त
चेन्नईमध्ये २९ लाखांचे सोने, सिगारेट अन् लॅपटॉप जप्त

By

Published : Dec 22, 2019, 8:28 AM IST

चेन्नई - आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शनिवारी तीन प्रवाशांकडून सोने, लॅपटॉप आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

जकात विभागाने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली. दुबईवरून आलेल्या दोन प्रवाशांनी आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये लपवलेले सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले. तसेच, त्यांच्या सामानातून ५,७६० सिगारेट्स आणि १० लॅपटॉपही मिळाले. दुसऱ्या एका घटनेमध्ये, कोलंबोवरून आलेल्या एका प्रवाशाकडूनही सोने जप्त करण्यात आले. त्याने, आपल्या गुदाशयात हे सोने लपवले होते.

जप्त करण्यात आलेल्या एकूण सोन्याची किंमत २८.१० लाख आहे. तर, सिगारेट आणि ल‌ॅपटॉपची किंमत १.०७ लाख आहे. जकात विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २० लाखांपेक्षा कमी किंमतीचे सोने बाळगणाऱ्या प्रवाशांना पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे तपासून सोडण्यात येते. त्याहून अधिक किंमतीचे सोने जवळ असेल, आणि त्याची कागदपत्रे नसतील, तर अटक करण्यात येते..

हेही वाचा : मडगाव येथे ‘आदि महोत्सवा’ला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details