पणजी - नयनरम्य समुद्र किनारा असल्यानं गोवा देशी तसेच विदेशी पर्यंटकांचं कायमच आकर्षण राहीला आहे. पर्यटकांचा ओघ जास्त असल्याने गोव्यामध्ये पर्यटनाबरोबर अवैध व्यवसायांचाही सुळसुळाट झाला आहे. नुकतीच सोशल मिडियावर गोव्यामध्ये "न्युड पार्टी" ओयोजित केल्याबाबतची एक जाहिरात चांगलीच गाजत आहे. या पोस्टरवर पत्ता देण्यात आला नसून पोलिसांनी या पोस्टरमागे असणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
गोव्यात 'न्युड पार्टी' पोस्टरची सोशल मिडियावर चर्चा, तपास सुरू - nude party poster goa
नुकतीच सोशल मिडियावर गोव्यामध्ये न्युड पार्टी ओयोजित केल्याबाबतची एक जाहिरात चांगलीच गाजत आहे.
या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जाहिरातीची तारीख किंवा इतर माहिती या पोस्टरवर नाही. फक्त एक मोबाईल नंबर पोस्टरवर देण्यात आला आहे. या मोबाईल मालकाचा आम्ही शोध घेत आहोत, असे पी. के. सिंह गुन्हे शाखा गोवा यांनी सांगितले.
न्युड पार्टीमध्ये १५ ते २० परदेशी मुली आणि १० पेक्षा भारतीय मुली सहभागी होणार आहेत, असे या पोस्टरवर लिहले आहे. प्रायव्हेट गोवा पार्टी, असे नाव या पोस्टरला देण्यात आले आहे. अशा प्रकारची कोणी पार्टी आयोजित करत आहे का? किंवा कोणीतरी खोडसाळपणा केला आहे? या शक्यताही पोलीस तपासून पाहत आहे. न्युड पार्टीच्या या पोस्टरमुळे नागरिकांना चांगलाच चर्चेला विषय मिळाला आहे.