महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 : जगभर कोरोनाचे थैमान.. 10 लाख 98 हजार संक्रमित; ५९ हजार दगावले - कोरोनामुळे जगभरात इतके मृत्यू

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा 10 लाखांच्या पुढे गेला आहे. तर 59 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा कठीण परिस्थितीतही दिलासा देणारी बातमी म्हणजे 2 लाख 28 हजार रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

Global COVID-19 tracker
Global COVID-19 tracker

By

Published : Apr 4, 2020, 12:00 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा 10 लाखांच्या पुढे गेला आहे. तर 59 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा कठीण परिस्थितीतही दिलासा देणारी बातमी म्हणजे 2 लाख 28 हजार रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे.

COVID-19 : जगभर कोरोनाचे थैमान.. 10 लाख 98 हजार संक्रमित; ५९ हजार दगावले

कोरोना महामारीचा जगभर प्रसार झाला आहे. जगभरात या साथीच्या रोगाने 10,98,762 पेक्षा जास्त संक्रमित झाले आहेत. तर कोरोनामुळे 59,172 पेक्षा जास्त लोकांना ठार केले आहे. आतापर्यंत 2,28,923 पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत.

अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक (2,77,850) रुग्ण आढळले असून तर (7402) जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ इटली (1,19,827) जण संक्रमित असून (14,681) मृत्यू , तसेच स्पेन संक्रमित (1,19,199) तर (11,198) मुत्यू झाला आहे. तर भारतामध्ये कोरोनाचे संक्रमण कमी असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 2 हजार 902 आहे. तर भारतात कोरोनामुळे 68 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचा सर्वांत जास्त धोका वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या लोकांना आहे. कोरोना महामारीने हजारो नागरिक जीवास मुकले आहेत. चीनमध्ये प्रथम आढळून आलेला कोरोना विषाणू आता जगातील प्रत्येक खंडामध्ये पोहोचला आहे. त्यामुळे जागतिक व्यापार, उद्योगधंदे, व्यवहार, प्रवासी वाहतूक, पर्यटन आणि एकंदरीत जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक देशांनी लॉकडाऊनसह आरोग्य आणीबाणी जारी केली आहे. सगळ्याच देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मास्क, आरोग्य सुरक्षा उपकरणे, व्हेंटिलेटर, गोळ्या औषधांची कमतरता भासू लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details