महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊन : बसमध्येच तिने दिला बाळाला जन्म

जिल्ह्यातील एका महिलेने सिटी बसमध्येच बाळाला जन्म दिला आहे. बस चालक ओम प्रकाश आणि आशा सहयोगिनींच्या मदतीने या महिलेने बसमध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर बाळ आणि आईला जे.के. लोन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Girl born in a moving bus in Kota
Girl born in a moving bus in Kota

By

Published : May 2, 2020, 12:17 PM IST

कोटा - जिल्ह्यातील एका महिलेने सिटी बसमध्येच बाळाला जन्म दिला आहे. बस चालक ओम प्रकाश आणि आशा सहयोगिनींच्या मदतीने या महिलेने बसमध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर बाळ आणि आईला जे.के. लोन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी, सार्वजनिक वाहतुकीचे सर्व मार्ग लॉकडाउनमध्ये बंद आहेत. तथापि, लॉकडाउनमध्ये, कंटेंट झोनमध्ये आणि शहराच्या विविध भागात स्क्रीनिंगसाठी पथके आहेत. या पथकांना वाहतुकीसाठी शहरी परिवहन सेवेच्या बसेस देण्यात आल्या आहेत.

स्क्रीनिंगसाठी आशा महिलाचे पथक सिटीमधून घाटकोट चौकाजवळून जात होते. तेवढ्यात, त्यांना एक महिला रस्त्यावर प्रसूतीच्या कळा सहन करताना दिसली. पथकाने बस थांबविली आणि गर्भवती महिलेला बसमध्ये घेऊन रुग्णालयाच्या दिशेने निघाले. मात्र, बसमध्ये चढताच महिलेच्या वेदना आणखी वाढल्या. त्यावर आशा पथकाने बसमध्येच त्या महिलेची सुखरूप प्रसूती केली. प्रसूतीनंतर बाळ व आईची प्रकृती उत्तम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details