महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्य प्रदेशात महिलेवर सामूहिक अत्याचार; पोलिसांनी तक्रार न घेतल्याने पीडितेची आत्महत्या

यूपीतील हाथरस, बलरामपूरच्या घटनांनंतर मध्य प्रदेशात नरसिंहपूर जिल्ह्यातील एका महिलेवर सामूहिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. त्यातही पोलिसांच्या बेपर्वाईमुळे पीडितेने आत्महत्येचा मार्ग निवडला.

gangrape-victim-commit-suicide-in-narsinghpur
मध्यप्रदेशात नरसिंहपुर जिल्ह्यात महीलेवर सामूहिक अत्याचार

By

Published : Oct 3, 2020, 11:57 AM IST

नरसिंहपूर -यूपीच्या हाथरस आणि बलरामपूर बलात्कार प्रकरणांनंतर मध्य प्रदेशात नरसिंहपूर जिल्ह्यातील एका अनुसूचित जातीच्या महिलेवर सामूहिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, पीडिता तिच्या कुटुंबीयांसोबत तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली असता. तिची तक्रार घेण्यात आली नाही. उलट पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक केल्याची घटना घडली. ही तक्रार दाखल न झाल्यानंतर पीडितेने आत्महत्या केली. नरसिंहपूरच्या चिचली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या एका गावात हे प्रकरण घडले.

पीडितेच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी जाग आली आणि त्यांनी कारवाई करत तीन जणांवर सामूहिक अत्याचार, आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच तक्रार नोंदविण्याबाबत निष्काळजीपणा केल्याबद्दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावरही कारवाई करण्यात आली आहे. मृत पीडितेच्या पतीने असा आरोप केला की, तो तीन दिवस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी जात होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक करण्याऐवजी पीडितेच्या कुटुंबाला तुरुंगात ठेवले.

पीडितेच्या पतीनेगदारवारा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीओपी) सीताराम यादव यांना सांगितले की, त्याची पत्नी 28 सप्टेंबर रोजी शेतातील चारा कापण्यासाठी गेली होती. तिथे परसू, गुड्डा आणि अनिल नावाच्या तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. संध्याकाळी घरी आल्यावर पीडितेने कुटुंबाला हे सांगितले.

यानंतर, रात्री संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनला गेले. तिथे त्यांना सकाळी वैद्यकीय तपासणी करण्यास सांगण्यात आले. मात्र 29 सप्टेंबर रोजी स्टेशनला पोहोचल्यावर त्यांनी आपली तक्रार घेतली नाही, असा आरोप पीडितेच्या कुटुंबाने केला आहे. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी त्यांनी चिचली पोलीस स्टेशन गाठले, तेथे पोलिसांनी त्यांची बाजू ऐकण्याऐवजी पीडीत महिलेचे पती आणि मोठ्या भावाला लॉकअपमध्ये बंद केले. तर, पीडित महिलेसोबत गैरवर्तवणूक करण्यात आली. तसेच, पीडीतेच्या कुटुंबाला सोडण्याच्या बदल्यात पोलिसांनी त्यांच्याकडून पैसेही घेतल्याचा आरोप आहे. या वागण्याने त्रस्त झालेल्या महिलेने 2 ऑक्टोबर रोजी सकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली.

या प्रकरणात एसडीओपी सीताराम यादव म्हणाले, महिलेवर तीन जणांनी अत्याचार केल्याची तक्रार आली आहे. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details