उत्तराखंड -हिवाळ्यामुळे गंगोत्री धामचे दरवाजे सोमवारी ११ वाजून ४० मिनिटांनी बंद केले आहेत. तत्पुर्वी गंगा देवीची सुरू झाली असून दरवाजे बंद झाल्यानंतर देवीची उत्सवमूर्ती पालखीतून मुखबा येथे पाठवली जाईल.
गंगोत्री धामचे दरवाजे बंद हेही वाचा -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांंना जयंतीनिमित्त वाहिली पुष्पांजली
मुखबा येथील मार्कण्डेय जवळ गंगा देवीची पालखी रात्रीचा मुक्काम करणार आहे. दुसऱ्या दिवशी गंगा देवीच्या उत्सव मुर्तीची मुखबा येथील मंदिरात स्थापना करण्यात येणार आहे. यानंतर भक्तांना देवीचे दर्शन करता येणार आहेत.
हेही वाचा-परंपरेत खंड! भारत-पाकदरम्यान मिठाईची देवाण-घेवाण नाही
उद्या (ता.२९) ला यमुनोत्रीचे दरवाजे हिवाळ्यामुळे बंद केले जाणार आहेत. त्याचबरोबर केदारनाथ धामचेही दरवाजे बंद केले जाणार आहेत. यावेळी गंगोत्री दर्शनासाठी ५ लाखांहून अधिक भाविक आले होते.