महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गांधी १५० : गांधी, आझाद अन् गफ्फार खान यांनी पाहिले होते अखंड भारताचे स्वप्न

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त, आपण गांधीजी आणि त्यांच्या विचारांबद्दल जाणून घेत आहोत. आजच्या लेखामध्ये आपण गांधीजींच्या विचारांचा मौलाना अबुल कलाम आझाद आणि गफ्फार खान यांच्यावर पडलेला प्रभाव, तसेच त्यांनी पाहिलेल्या अखंड भारताच्या स्वप्नाबद्दल जाणून घेणार आहोत. हा लेख असद मिर्झा यांनी लिहिला आहे.

Gandhi 150

By

Published : Sep 23, 2019, 3:48 PM IST

नवी दिल्ली- गांधीजींच्या विचारांमुळे आणि तत्त्वांमुळे हजारो लोक त्यांचे समर्थक झाले. या लोकांमध्ये केवळ हिंदूच नाही, तर मुस्लीम समाजाचे लोकदेखील सहभागी होते. मुस्लीम लोकांसह दोन मोठे मुस्लीम नेतेदेखील गांधीजींच्या अहिंसावादाला समर्थन देत, त्यांच्या सोबत उभे होते. ते म्हणजे, खान अब्दुल गफ्फार खान आणि मौलाना आझाद.

भारताच्या मुख्य भूमीवर गांधीजी ब्रिटिशांविरूद्ध लढा देत असतानाच, भारताच्या उत्तर-पश्चिमी सीमा प्रांतात आणखी एक महात्मा उदयास येत होता - खान अब्दुल गफ्फार खान. बादशाह खान आणि बच्चू खान या नावांनी देखील ओळखले जाणारे गफ्फार खान, हे पश्तून (पठाण) समाजातील स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांच्या महानतेने सर्व आदीवासी आणि जातीय सीमांना ओलांडले. लढाऊ जमातींसाठी कुप्रसिद्ध अशा प्रांतात जन्म घेतलेले गफ्फार खान मात्र, गांधीजींचे कट्टर अनुयायी होते. अहिंसा आणि सत्याग्रहाप्रती असलेल्या त्यांच्या ओढीमुळे, त्यांना 'सीमेवरील गांधी' हे नवीन टोपणनाव मिळाले.

हेही वाचा : महात्मा गांधी : विज्ञानवादी की विज्ञान-विरोधी..?

मक्कामधील हज यात्रा करून परतल्यानंतर, गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहापासून प्रेरणा घेत, गफ्फार खान यांनी 'खुदाई खिदमतगार चळवळ' सुरु केली. त्यांचा प्रामाणिकपणा, अहिंसेप्रती असलेली वचनबद्धता आणि एकत्र भारतावरील अतूट विश्वास यांमुळे लोक त्यांना पाठिंबा देऊ लागले. आपल्या लढाऊपणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पश्तून समाजातील लाखो लोक त्यांचे अनुयायी झाले, त्यामुळे पश्तून लोक आंदोलनासाठी अहिंसेचा मार्गही स्वीकारू शकतात हे सिद्ध झाले.

१९२८ मध्ये महात्मा गांधी आणि गफ्फार खान यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यांनर खान काँग्रेस पक्षात सहभागी झाले. वेगवेगळ्या वातावरणात मोठे झालेले, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले हे दोन नेते, नंतर तासन् तास राजकारण, धर्म आणि सांस्कृतीक विषयांवर चर्चा करत. गफ्फार खान यांचा पारदर्शक प्रामाणिकपणा, मोकळेपणा आणि साधेपणा गांधीजींना खूपच आवडला. गफ्फार खान हे खऱ्या अर्थाने 'खुदाई खिदमतगार' म्हणजेच देवाचे सेवक होते. योग्य आचरण, विश्वास आणि प्रेम हे त्यांच्या जीवनातील तीन प्रमुख आदर्श होते.

हेही वाचा : मृत्यू म्हणजे अतिशय प्रिय असा मित्र : महात्मा गांधी

बादशाह खान नेहमी म्हणत, की अहिंसा हे प्रेम आहे, जे लोकांमध्ये धाडस निर्माण करते. अहिंसेचा अवलंब केल्याशिवाय लोकांमध्ये शांतता निर्माण होऊ शकत नाही. मानवतेची सेवा म्हणजेच इश्वराची सेवा असे ते मानत. कोणताही धर्म जो मानवांमधील एकता नष्ट करण्याला प्रोत्साहन देतो तो खरा धर्म असूच शकत नाही. अहिंसेचा उल्लेख पवित्र कुराणात आहे. पैगंबराने वापरलेले हे शस्त्र आहे, मात्र याबद्दल तुम्हाला माहिती नाही. धैर्य आणि चांगुलपणा हे ते शस्त्र आहे, ज्याच्यासमोर जगातील कोणतीही शक्ती टिकू शकत नाही. असे ते म्हणत.

गांधींचे दुसरे कट्टर समर्थक म्हणजे, मौलाना अबुल कलाम आझाद. एक प्रसिद्ध लेखक, कवी आणि पत्रकार असलेले मौलाना हे प्रभावी स्वातंत्र्य सैनिक देखील होते. ते काँग्रेसचे प्रख्यात राजकीय नेते होते. १९२३ आणि १९४० ला त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदीदेखील निवड झाली होती. स्वतः मुस्लीम असूनदेखील त्यांनी मुहम्मद अली जिन्नांसारख्या मूलगामी विचारांच्या मुस्लीम नेत्यांना वेळोवेळी विरोध केला.

इजिप्त, तुर्की, सिरिया आणि फ्रान्स या देशांच्या भेटीवरून परतल्यानंतर आझाद यांनी अरुबिंदो घोष आणि श्याम सुंदर चक्रवर्ती या दोन क्रांतीकारकांची भेट घेतली. त्यांच्यामुळे आझाद यांना आपल्या मूलगामी राजकीय विचारांना बदलण्याची संधी आणि प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्राऐवजी समाजाला महत्त्व देणाऱ्या मुस्लीम नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यांनी अखिल भारतीय मुस्लीम संघाच्या फाळणीवादी विचारांनादेखील तीव्रपणे नकार दिला.

हेही वाचा : गांधी १५० : गांधीजी 'महात्मा' का होते..?

गांधींच्या असहकार आंदोलनाच्या माध्यमातून मौलाना स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाले. त्यानंतर १९२० साली खिलाफत चळवळीचा ते चेहरा झाले. १९२० सालीच गांधीजींना पाठिंबा देत, आझाद काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले. १९२३ मध्ये जेव्हा त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले, तेव्हा ते काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष होते. काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले. धर्मावर आधारित स्वतंत्र्य मतदान प्रक्रियेचा अंत करण्याचे श्रेय आझाद यांनाच जाते.

गांधी, आझाद आणि गफ्फार खान तिघांचेही एकच स्वप्न होते. ते म्हणजे एक असा स्वतंत्र भारत, ज्यात हिंदू, मुस्लीम आणि सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आणि सलोख्याने राहतील. मात्र, फाळणीमुळे, त्यांच्या स्वप्नातील भारत, आणि त्यांचे स्वप्न दोन्ही दुभंगले गेले.

हेही वाचा : दलितांसाठी गांधीजींनी मिळविलेला विजय

ABOUT THE AUTHOR

...view details