महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यसभा : पोस्टाच्या परीक्षेतील भाषेवरुन विरोधकांचा गोंधळ, १४ जुलैला झालेली परीक्षा रद्द

परीक्षेसाठी केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येच प्रश्नच विचारण्यात आले होते. यावरुन आज अण्णाद्रमुक, द्रमुक यांच्यासह इतर अनेक विरोधी पक्षांनी परीक्षा रद्द करा म्हणून राज्यसभेत गोंधळ घातला होता.

संग्रहीत छायाचित्र

By

Published : Jul 16, 2019, 7:47 PM IST

नवी दिल्ली- तामिळनाडूमध्ये पोस्ट विभागाची १४ जुलैला (रविवार) परीक्षा झाली होती. परीक्षेसाठी केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येच प्रश्नच विचारण्यात आले होते. यावरुन आज अण्णाद्रमुक, द्रमुक यांच्यासह इतर अनेक विरोधी पक्षांनी परीक्षा रद्द करा म्हणून राज्यसभेत गोंधळ घातला.

राज्यसभेचे कामकाज सुरू होताच, अण्णाद्रमुक, द्रमुक, भाकप, आणि माकपच्या अनेक सदस्यांनी तामिळनाडूत झालेल्या पोस्टाची परीक्षा रद्द करा म्हणून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधकांच्या गोंधळानंतर मंगळवारी काही काळासाठी राज्यसभेची कार्यवाही स्थगित करण्यात आली. कार्यवाही सुरू झाल्यानंतर, पोस्टाची परीक्षा विभिन्न भाषांसह पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच १४ जुलैला झालेली परीक्षा रद्द करण्यात आली.

रविशंकर प्रसाद यांनी माहिती देताना सांगितले, की विरोधकांनी मांडलेल्या मुद्यानंतर १४ जुलैला झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने होणाऱ्या परीक्षेत सर्व प्रादेशिक भाषेंचा समावेश करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी सरकार सर्व प्रादेशिक भाषांचा सन्मान करते. प्रसाद यांच्या घोषणानंतर विरोधकांनीही संवेदनशील मुद्दा मार्गी लावल्याबद्दल प्रसाद यांना धन्यवाद म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details