महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चक्क जिवंत व्यक्तीची अंत्ययात्रा! पाऊस थांबण्यासाठी अंधश्रद्धेचा कळस - madhya pradesh

मध्यप्रदेशात सातत्याने मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामळे पाऊस थांबावा यासाठी लोक विविध प्रथांचा अवलंब करत आहेत.

पाऊस थांबण्यासाठी काढली जिवंत व्यक्तीची अंत्ययात्रा

By

Published : Sep 16, 2019, 6:51 PM IST

Updated : Sep 16, 2019, 8:07 PM IST

शाजापूर - मध्यप्रदेशात सुरू असलेल्या पावसाने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा पाऊस कमी व्हावा यासाठी लोक विविध अंधश्रद्धांचा आणि प्रथांचा आधार घेत आहेत. असाच एक अजब प्रकार शाजापूर जिल्ह्यातील सिंध गावात पाहायला मिळाला. पाऊस थांबावा यासाठी लोकांनी ढोल ताशांच्या गजरात चक्क जिवंत व्यक्तीची अंत्ययात्रा काढली आणि स्मशानापर्यंत घेऊन गेले. असे केल्याने पाऊस थांबतो, अशी लोकांची धारणा आहे.

पाऊस थांबावा यासाठी लोकं विविध प्रथांचा अवलंब करत आहेत.

हेही वाचा - मुस्लीम बांधवांनी जानवे घालून केले हिंदू ब्राह्मणावर अंत्यसंस्कार...

जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने नागरिकांना घराबाहेर निघता येईना. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. नदी काठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. लोकांची कामे ठप्प झाली आहेत. या सर्वांपासून सुटका मिळावी यासाठी अशा प्रथांचा आधार लोकं घेत आहेत.

हेही वाचा - परिस्थिती पूर्वपदावर आणा; काश्मीर दौऱ्यासाठी आझादांना सर्वोच्च न्यायालयाकडून आझादी

Last Updated : Sep 16, 2019, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details