महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू, मुलांनी व्हिडिओ कॉलद्वारे घेतले वडिलांचे अंतिम दर्शन - कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

इंदूरमध्ये कोरोना संक्रमित डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्यांचे तीन मुलं आणि पत्नी त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांची तिन्ही मुलं ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे वडिलांचे अंतिम दर्शन घेतले होते.

indore
मुलांनी व्हिडीओ कॉलद्वारे घेतले वडिलांचे अंतिम दर्शन

By

Published : Apr 11, 2020, 10:19 AM IST

भोपाळ- कोरोना महामारीमुळे आतापर्यंत देशभरात होणाऱ्या सर्व मृत्यूची तीव्र बाब म्हणजे, बहुतेक प्रकरणांमध्ये मृतांचे नातेवाईक त्यांचे शेवटचे अंत्यसंस्कार देखील करु शकत नाहीत. त्यामुळे ही महामारी देखील सामाजिक शोकांतिकेचे कारण बनत आहे. मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांनाही या वेदनातून जावे लागत आहे. इदूरमधील डॉ. शत्रुघ्न पंजवानी यांचे कोरोनामुळे निधन झाले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचे अंतिम संस्कार करता आले नाहीत. तर त्यांच्या पत्नीलाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुलांनी व्हिडीओ कॉलद्वारे घेतले वडिलांचे अंतिम दर्शन

जनरल फिजिशियन डॉक्टर शत्रुघ्न पंजवानी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना अरविंदो रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर शहरातील गुरु कृपा कॉलनीत 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबात आई-वडील आणि भाऊ आहेत. परंतु तिघेही अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकले नाहीत, कारण कोरोना संसर्ग होण्याचा धोका जास्त होता. महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले.

त्याचवेळी पलहार नगरमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांना दोन मुली आहेत. एक लंडनमध्ये राहते, तर दुसरी गंजबासौदामध्ये राहते. वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतरही दोन्ही मुलींना वडिल्यांच्या अंत्यदर्शनाला जाता येवू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details