न्युयॉर्क - पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून फरार झालेला आरोपी मेहूल चोक्सी पुढील काही दिवसांमध्ये भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिरेव्यापारी मेहूल चोक्सी अँटिग्वा या देशामध्ये राहत आहे. चोक्सीने फसवणूक केल्याचं आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारतीय अधिकारी त्यांची कधीही चौकशी करु शकतात, तसेच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चोक्सीचे प्रत्यार्पण करण्यात येईल, असे अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊनी यांनी सांगितले.
फरार हिरेव्यापारी मेहूल चोक्सीला भारताच्या ताब्यात देणार - गॅस्टोन ब्राऊनी - पीएनबी घोटाळा
चोक्सीने फसवणूक केल्याचं आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारतीय अधिकारी त्यांची कधीही चौकशी करु शकतात, गॅस्टोन ब्राऊनी
पीएनबीमध्ये १३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि निरव मोदींवर आहे. निरव मोदीने फसवणूक केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे, त्याबाबत सबळ पुरावेही आमच्याकडे आहे. न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येईल, असे ब्राऊनी यांनी म्हटले आहे. संयुक्ता राष्ट्राच्या आमसभेला आले असता न्युयॉर्क येथे एएनआय या वृत्त संस्थेशी ते बोलत होते.
१७ जुन रोजी मेहूल चोक्सी यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मी अँटिग्वामध्ये राहत असून तपासात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघांनीही देशाबाहेर पलायन केले आहे. चोक्सी आणि निरव मोदी यांना तपासासाठी देशामध्ये आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.